ब्रेकिंग न्यूज: महाराष्ट्रात मंकीपॉक्स (Mpox) चा रुग्ण आढळला!

धुळे जिल्ह्यात राज्यात मंकीपॉक्सचा (Mpox) पहिला रुग्ण आढळून आला आहे. या घटनेमुळे राज्यभरातील आरोग्य यंत्रणा हाय अलर्ट मोडवर आली आहे.
* कुठे आढळला रुग्ण: धुळे, महाराष्ट्र.
* रुग्णाची माहिती: ४४ वर्षीय पुरुष, जो नुकताच सौदी अरेबियातून परतला होता.
* सद्यस्थिती: रुग्णाला धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात विलगीकरण कक्षात (Isolation Ward) ठेवले आहे आणि त्याची प्रकृती स्थिर आहे.
* चाचणी अहवाल: पुण्यातील एनआयव्ही (NIV) प्रयोगशाळेने चाचण्यांमध्ये मंकीपॉक्सची लागण झाल्याची पुष्टी केली आहे.
* दिलासादायक बाब: रुग्णाच्या संपर्कात आलेल्या इतर दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
* आरोग्य विभागाचे निर्देश: आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेल्या शहरांमध्ये प्रवाशांची तपासणी वाढवण्यात आली असून, नागरिकांना कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here