निम्न तापी सिंचन प्रकल्पासाठी तातडीने निधी मंजूर करा – खासदार स्मिता वाघ

नवी दिल्ली, २२ मार्च २०२५ – जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी सिंचन प्रकल्पाला केंद्र सरकारने तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी खासदार स्मिता वाघ यांनी लोकसभेत केली. हा प्रकल्प PMKSY-AIBP योजनेत समाविष्ट असून, 32,328 हेक्टर शेतीला सिंचन आणि हजारो नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवणारा आहे. गेल्या 25 वर्षांपासून निधीअभावी रखडलेल्या या प्रकल्पासाठी ₹2,014 कोटींची गरज आहे.

 

खासदार वाघ यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जलसंधारणाला गती मिळाली असून, जल जीवन मिशन अंतर्गत जळगावात नळजोडणीची कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र, निधी विलंबामुळे प्रकल्प रखडण्याची भीती आहे. त्यांनी अमळनेर, भडगाव, पाचोरा आदी तालुक्यांतील पाणीपुरवठा योजनांसाठीही त्वरित निधी मंजुरीची मागणी केली.

 

मागण्या:

 

निम्न तापी प्रकल्पासाठी तातडीने निधी मंजूरी

जलसंधारण प्रकल्पांचा नियमित आढावा

निधी वितरणाला गती

ग्रामीण पाणीपुरवठा सक्षम करणे

खासदार वाघ यांनी केंद्र सरकारला ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here